भाजपच्या माजी खासदाराच्या पुतण्याची आत्महत्या, गुन्हा दाखल

मुंबई: भाजप माजी खासदाराच्या 21 वर्षीय पुतण्याने मंगळवारी मुंबईत राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. तसेच अंधेरी पोलीस स्टेशनच्या अधिकारींनी सांगितले की, उत्तर प्रदेशचे माजी खासदार संगम लाल …

भाजपच्या माजी खासदाराच्या पुतण्याची आत्महत्या, गुन्हा दाखल

मुंबई: भाजप माजी खासदाराच्या 21 वर्षीय पुतण्याने मंगळवारी मुंबईत राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. तसेच अंधेरी पोलीस स्टेशनच्या अधिकारींनी सांगितले की, उत्तर प्रदेशचे माजी खासदार संगम लाल गुप्ता यांचा पुतण्या आहे. तसेच मृत तरुण सागर अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून तो अंधेरी (पूर्व) येथील अंबुजवाडी भागात असलेल्या हरी दर्शन भवनच्या सातव्या मजल्यावर राहत होता.

 

मिळालेल्या माहितीनुसार “सागर दुपारी कॉलेजमधून घरी परतला. घरातील कोणाशीही न बोलता त्याने थेट सहाव्या मजल्यावर जाऊन ‘डक्ट एरिया’मधून उडी मारली. त्याचा मृतदेह काही नागरिकांनी पाहिला आणि पोलिसांना कळवले. सागरला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

 

मृतक हा उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी खासदार संगम लाल गुप्ता यांचा पुतण्या होता. तसेच सागर गुप्ता डिप्रेशनमध्ये होता की नाही आणि या पाऊलामागील कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोलीस त्या चौकशी करीत आहे. 

Go to Source