फ्लेमिंगोजवळ ड्रोन वापरल्याने कायदेशीर कारवाईची मागणी

सध्या नेटफ्लिक्सवर (netflix) सुरू असलेल्या मुकद्दर का सिकंदर या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरण्यात आला आहे. हा ड्रोन (drone) नवी मुंबईतील (navi mumbai) टी एस चाणक्य येथे उडवण्यात आला होता. टी एस चाणक्य ही जागा फ्लेमिंगोच्या (flamingo) विश्रांतीची जागा आहे. फ्लेमिंगोच्या जवळ ड्रोनचा धोकादायक वापर केल्याची तक्रार (complaint) नॅटकनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांनी केली आहे. राज्य खारफुटी विभागाने या तक्रारीची दखल घेतली आहे.  याप्रकरणी वनविभाग कायदेशीररित्या तपास करत असल्याचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितले. “चित्रपटात फ्लेमिंगोचे सौंदर्य दाखवण्यास आमचा काहीही आक्षेप नाही, पण विश्रांती करणाऱ्या पक्ष्यांवरून उडणाऱ्या ड्रोनचा वापर नक्कीच आक्षेपार्ह आहे,” असे नॅटकनेक्टचे संचालक बी.एन. कुमार म्हणाले.  तसेच खारफुटी सेलचे प्रमुख एस व्ही रामाराव, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी विभागीय वन अधिकाऱ्यांना या समस्येची दखल घेण्यास सांगितले आहे. “आम्ही सर्व कायदेशीर गोष्टींची पडताळणी केल्यानंतरच नोटीस पाठवू शकतो. अशा प्रकरणांमध्ये, ड्रोन शूटिंगसाठी पोलिसांकडून परवानगी मागितली जाते आणि चित्रपट निर्मात्यांनी परवानगी घेतली होती की नाही याची खात्री आम्ही अद्याप करू शकलो नाही, ” असे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे पुढे म्हणाले. बी.एन.कुमार यांना अपेक्षा आहे की, सरकारतर्फे चित्रपट निर्मात्यांना नोटीस मिळेल आणि त्यांना पक्ष्यांजवळ ड्रोन वापरण्याचे परिणाम समजावून सांगितले जातील. बी.एन.कुमार म्हणाले, “तीक्ष्ण ब्लेड असलेले ड्रोन आवाज करतात ज्यामुळे विश्रांती घेणाऱ्या पक्ष्यांना त्रास होऊ शकतो किंवा त्यांना इजाही होऊ शकते.”  खारफुटी विभागाने यापूर्वी टी. एस. चाणक्य वेटलँड येथे ड्रोन शूटच्या विरोधात नॅटकनेक्ट आणि सहकारी पर्यावरण गटांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश दिले होते. सागर शक्तीचे संचालक नंदकुमार पवार म्हणाले, “पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण आपले वन्यजीव गमावत आहोत आणि आता ड्रोन शूटचा हा नवीन धोका निर्माण झाला आहे.  अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेत या मूर्खपणाच्या आणि अत्यंत त्रासदायक प्रवृत्तीला आळा घालावा अशी आमची अपेक्षा आहे,” असे नंदकुमार पवार म्हणाले.हेही वाचा डिसेंबरमध्ये ‘या’ दिवशी मुंबईकरांना सुट्टी जाहीर दक्षिण मुंबईत 5 डिसेंबरला वाहतुकीत बदल, ‘हे’ मार्ग वळवले

फ्लेमिंगोजवळ ड्रोन वापरल्याने कायदेशीर कारवाईची मागणी

सध्या नेटफ्लिक्सवर (netflix) सुरू असलेल्या मुकद्दर का सिकंदर या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरण्यात आला आहे. हा ड्रोन (drone) नवी मुंबईतील (navi mumbai) टी एस चाणक्य येथे उडवण्यात आला होता. टी एस चाणक्य ही जागा फ्लेमिंगोच्या (flamingo) विश्रांतीची जागा आहे. फ्लेमिंगोच्या जवळ ड्रोनचा धोकादायक वापर केल्याची तक्रार (complaint) नॅटकनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांनी केली आहे. राज्य खारफुटी विभागाने या तक्रारीची दखल घेतली आहे.  याप्रकरणी वनविभाग कायदेशीररित्या तपास करत असल्याचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितले.“चित्रपटात फ्लेमिंगोचे सौंदर्य दाखवण्यास आमचा काहीही आक्षेप नाही, पण विश्रांती करणाऱ्या पक्ष्यांवरून उडणाऱ्या ड्रोनचा वापर नक्कीच आक्षेपार्ह आहे,” असे नॅटकनेक्टचे संचालक बी.एन. कुमार म्हणाले. तसेच खारफुटी सेलचे प्रमुख एस व्ही रामाराव, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी विभागीय वन अधिकाऱ्यांना या समस्येची दखल घेण्यास सांगितले आहे.“आम्ही सर्व कायदेशीर गोष्टींची पडताळणी केल्यानंतरच नोटीस पाठवू शकतो. अशा प्रकरणांमध्ये, ड्रोन शूटिंगसाठी पोलिसांकडून परवानगी मागितली जाते आणि चित्रपट निर्मात्यांनी परवानगी घेतली होती की नाही याची खात्री आम्ही अद्याप करू शकलो नाही, ” असे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे पुढे म्हणाले.बी.एन.कुमार यांना अपेक्षा आहे की, सरकारतर्फे चित्रपट निर्मात्यांना नोटीस मिळेल आणि त्यांना पक्ष्यांजवळ ड्रोन वापरण्याचे परिणाम समजावून सांगितले जातील. बी.एन.कुमार म्हणाले, “तीक्ष्ण ब्लेड असलेले ड्रोन आवाज करतात ज्यामुळे विश्रांती घेणाऱ्या पक्ष्यांना त्रास होऊ शकतो किंवा त्यांना इजाही होऊ शकते.” खारफुटी विभागाने यापूर्वी टी. एस. चाणक्य वेटलँड येथे ड्रोन शूटच्या विरोधात नॅटकनेक्ट आणि सहकारी पर्यावरण गटांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश दिले होते.सागर शक्तीचे संचालक नंदकुमार पवार म्हणाले, “पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण आपले वन्यजीव गमावत आहोत आणि आता ड्रोन शूटचा हा नवीन धोका निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेत या मूर्खपणाच्या आणि अत्यंत त्रासदायक प्रवृत्तीला आळा घालावा अशी आमची अपेक्षा आहे,” असे नंदकुमार पवार म्हणाले.हेही वाचाडिसेंबरमध्ये ‘या’ दिवशी मुंबईकरांना सुट्टी जाहीरदक्षिण मुंबईत 5 डिसेंबरला वाहतुकीत बदल, ‘हे’ मार्ग वळवले

Go to Source