विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 14,800 कोटी रुपये काढले

मुंबई : या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 14,800 कोटी रुपयांची उचल केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी संभ्रमावस्था दिसून आली होती. चीनमधील बाजारांमध्ये चांगल्या परताव्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी तेथे गुंतवणूक करणे पसंत केले. मे महिन्यामध्ये 25 हजार 586 कोटी कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतले होते. यासह एप्रिलमध्येसुद्धा 8700 […]

विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 14,800 कोटी रुपये काढले

मुंबई :
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 14,800 कोटी रुपयांची उचल केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी संभ्रमावस्था दिसून आली होती.
चीनमधील बाजारांमध्ये चांगल्या परताव्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी तेथे गुंतवणूक करणे पसंत केले. मे महिन्यामध्ये 25 हजार 586 कोटी कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतले होते. यासह एप्रिलमध्येसुद्धा 8700 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काहीशी सावध भूमिका घेतली होती. मार्च महिन्यामध्ये मात्र विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 35 हजार 98 कोटी रुपयांची भर घातली होती.