विदेशी चलन साठ्यात घसरण सुरुच

रिझर्व्ह बँकेची माहिती: सुवर्ण साठ्यात वाढ मुंबई : भारतीय विदेशी चलन साठ्यामध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात घसरणीचा सिलसिला कायम राहिला आहे. याच दरम्यान भारताच्या सुवर्ण साठ्यामध्ये मात्र वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार 19 एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 2.28 अब्ज डॉलर्सने घटून 640.33 […]

विदेशी चलन साठ्यात घसरण सुरुच

रिझर्व्ह बँकेची माहिती: सुवर्ण साठ्यात वाढ
मुंबई :
भारतीय विदेशी चलन साठ्यामध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात घसरणीचा सिलसिला कायम राहिला आहे. याच दरम्यान भारताच्या सुवर्ण साठ्यामध्ये मात्र वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार 19 एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 2.28 अब्ज डॉलर्सने घटून 640.33 अब्ज डॉलर्सवर राहिला होता. या मागच्या आठवड्यातसुद्धा देशाच्या विदेशी चलन साठा 5.40 अब्ज डॉलर्सने घटून 643.16 अब्ज डॉलर्सवर खाली आला होता. पण या ठिकाणी एक लक्षात घ्यायला हवे, की 5 एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये एकूण विदेशी चलन साठा 648.56 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचला होता. विदेशी चलन मालमत्ता साठ्यामध्ये 3.79 अब्ज डॉलरची घट झाली असून तो 560.86 अब्ज डॉलरवर राहिला आहे. दुसरीकडे सुवर्ण साठ्यामध्ये मात्र 1.01 अब्ज डॉलरची वाढ झाली असून सुवर्ण साठा 56.81 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.