फुटबॉल सामना गोलशून्य बरोबरीत

वृत्तसंस्था/ आबा (सौदी अरेबिया) फिफाच्या विश्वकरंडक पात्र फेरी स्पर्धेतील गुरुवारी येथे खेळविण्यात आलेला अ गटातील भारत आणि अफगाण यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. 2026 साली होणाऱ्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी सध्या पात्र फेरीची स्पर्धा विविध ठिकाणी खेळविली जात आहे. अफगाण आणि भारत यांच्यातील या अटीतटीच्या सामन्यात पूर्वार्धात भारतीय संघातील मनवीर सिंगने दोनवेळा अफगाणच्या […]

फुटबॉल सामना गोलशून्य बरोबरीत

वृत्तसंस्था/ आबा (सौदी अरेबिया)
फिफाच्या विश्वकरंडक पात्र फेरी स्पर्धेतील गुरुवारी येथे खेळविण्यात आलेला अ गटातील भारत आणि अफगाण यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. 2026 साली होणाऱ्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी सध्या पात्र फेरीची स्पर्धा विविध ठिकाणी खेळविली जात आहे. अफगाण आणि भारत यांच्यातील या अटीतटीच्या सामन्यात पूर्वार्धात भारतीय संघातील मनवीर सिंगने दोनवेळा अफगाणच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण अफगाणच्या गोलरक्षकाने भारताचा संभाव्य गोल थोपवला. या कालावधीत भारताकडून पूर्वार्धात अफगाणच्या तुलनेत अधिक आक्रमक चाली करण्यात आल्या पण उत्तरार्धात भारताने बचावात्मक पवित्रा घेतला होता. 17 व्या मिनिटाला भारताने गोल करण्याची संधी गमवली. 58 व्या मिनिटाला भारतीय संघातील आकाश मिश्राने विक्रम प्रताप सिंगला पास दिला पण त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. राहुल भेकेची चाल अफगाणच्या रेहमत अकबरीने फोल ठरवली. अखेर हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.