Happy Kiss Day: 13 फेब्रुवारीला किस डे च्या दिवशी या 4 वस्तु खाणे टाळा, मात्र 3 नक्की खा
13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जात आहे. काही फूड्स तुमच्या किस डे ला बिघडवू शकतात. याशिवाय काही फूड्स असे पण आहेत जे तुमच्या किस डे ला स्पेशल बनवू शकतात. तर चला जाणून घेऊ या फूड्स बद्दल.
लसूण- किस डे ला चुकून पण लसणाचे सेवन करू नका. लसूण तुमच्या किस डे ला खराब करू शकतो. कारण लसूण खाल्ल्यास तुमच्या तोंडाला वास येऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या पार्टनरचा मूड खराब होऊ शकतो.
अल्कोहोल- किस डे ला अल्कोहोलचे सेवन करणे चुकीचे ठरू शकते. अल्कोहोल तुमच्या तोंडाला कोरडे करते आणि तुमच्या तोंडाला वास येऊ शकतो.
च्युइंगम आणि मिंट – श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही च्युइंगम आणि मिंट ची मदत घेत असाल तर असे केल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. यात शुगरची मात्रा जास्त प्रमाणात असते. जी तुमच्या श्वासाला दुर्गंध देऊ शकते.
कॉफी- तुमच्या तोंडाला कोरडे बनवते. ज्यामुळे तुमचा श्वास दुर्गंधयुक्त होईल. कॉफी न घेता तुम्ही हॉट किंवा आइस्ड टी चे सेवन करू शकतात.
काय खावे-
सफरचंद खाल्ल्यास तोंडात लाळ चांगल्या प्रमाणात बनते. लाळ मध्ये ऑक्सीजनचे प्रमाण जास्त असते. जे बॅक्टेरियाला नष्ट करते. आणि तुमच्या तोंडातून वास येत नाही.
दालचीनी- दालचीनी खाणे तुमच्या किस डे ला चांगले बनवू शकते. कारण दालचीनी खाल्ल्यास तुमच्या तोंडाला कुठल्याच प्रकारचा दुर्गंध येणार नाही.
वेलची आणि खडीसाखर- हे चांगले माउथफ्रेशनर आहे. वेलची आणि खडीसाखर खाल्ल्यास तोंडाला कुठल्याच प्रकारची दुर्गंधी येणार नाही.आणि किस डे चा आनंद घेऊ शकाल.
Edited By- Dhanashri Naik