चेहरा उजळण्यासाठी हे उपाय अवलंबवा

सुंदर दिसणे हे प्रत्येकाची अपेक्षा आणि आवड असते.निसर्गाने आपल्याला धान्य, फळे आणि भाज्यांच्या रूपात आरोग्य आणि सौंदर्यचे वरदान दिले आहे. या अशा गोष्टी आहेत, ज्याचे सेवन केल्यावर किंवा त्वचेवर लावल्यास आपली त्वचा उजळते

चेहरा उजळण्यासाठी हे उपाय अवलंबवा

सुंदर दिसणे हे प्रत्येकाची अपेक्षा आणि आवड असते.निसर्गाने आपल्याला धान्य, फळे आणि भाज्यांच्या रूपात आरोग्य आणि सौंदर्यचे वरदान  दिले आहे. या अशा गोष्टी आहेत, ज्याचे सेवन केल्यावर किंवा त्वचेवर लावल्यास आपली त्वचा उजळते.चला तुम्हाला असे काही प्रयोग सांगतो, ज्याद्वारे तुम्ही तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर बनवू शकता-

 

* 1 चमचे हिरव्या मुगाचे पीठ घेऊन त्यात 1/ 4  चमचे खोबरेल तेल आणि चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा काळवंडणे, सुरकुत्या पडणे, मुरुम व ब्लॅक हेड्स इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

 

* मेथीची पाने बारीक करून रात्री चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.

 

* जायफळ कच्च्या दुधात बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा. तुम्हाला मुरुमांपासून आराम मिळेल.

 

* पुदिन्याच्या पानांचा रस स्ट्रॉबेरीचा रस गव्हाच्या कोंडामध्ये मिसळून लावल्यानेही त्वचा सुंदर होते.

चला तर मग या दिवाळीत करून बघा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By – Priya Dixit