नात्यात भांडण होणे ही खूप सामान्य गोष्ट आहे, पण ते भांडण किती काळ टिकते आणि कशा प्रकारे मिटवले जाते, यावर तुमच्या नात्याचा गोडवा अवलंबून असतो. जोडीदारासोबतचे कडाक्याचे भांडण चुटकीसरशी मिटवण्यासाठी तुम्ही या काही ‘मॅजिकल’ टिप्स फॉलो करू शकता:
१. ‘पॉज’ घेण्याची जादू
भांडण रंगात आले असताना रागाच्या भरात आपण असे काही बोलून जातो, ज्याचा नंतर पश्चात्ताप होतो. अशा वेळी मौन पाळा. जर तुम्हाला वाटत असेल की आता शब्द वाढत आहेत, तर थोडा वेळ शांत राहा. तुम्ही जागा बदला अर्थात त्या खोलीतून बाहेर पडा किंवा पाणी प्यायला जा. यामुळे डोकं शांत व्हायला मदत होते.
२. आधी ऐकून घ्या
अनेकदा आपण समोरच्याचे म्हणणे ऐकण्याऐवजी फक्त उत्तर देण्यासाठी बोलत असतो. जोडीदाराला त्यांचे पूर्ण म्हणणे मांडू द्या. त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका. जेव्हा त्यांना वाटेल की तुम्ही त्यांना समजून घेत आहात, तेव्हा त्यांचा अर्धा राग तिथेच मावळेल.
३. ‘मी’ भाषेचा वापर करा
“तू नेहमी असं करतोस” ऐवजी “मला तेव्हा दुखावलं गेलं” किंवा “मला असं वाटलं” असे वाक्य वापरा. याने जोडीदाराला बचावात्मक वाटत नाही आणि संवाद सोपा होतो.
४. इगो बाजूला ठेवून पुढाकार घ्या
भांडण कोणी सुरू केलं यापेक्षा ते कोण संपवतं हे जास्त महत्त्वाचं असतं. जर तुमची चूक असेल, तर ‘सॉरी’ म्हणायला कसर सोडू नका. कधीकधी हजार शब्दांपेक्षा एक ‘जादूची झप्पी’ सगळं काही सुरळीत करते. शारीरिक जवळीकीमुळे शरीरात ‘ऑक्सिटोसिन’ हार्मोन रिलीज होतो, जो तणाव कमी करतो.
५. जुन्या गोष्टी उकरून काढू नका
सध्याच्या भांडणात मागच्या वर्षीच्या चुका काढणे ही सर्वात मोठी चूक आहे. जे झाले ते विसरा आणि फक्त सध्याच्या विषयावर बोला.
