भारताकडून दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन
महिलांची एकमेव कसोटी : स्नेह राणाचे आठ बळी, सुने लुसचे दुसऱ्या डावात शतक
वृत्तसंस्था/ चेन्नई
येथे सुरु असलेल्या यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार दिवसांच्या एकमेव कसोटी सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारताकडून दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन स्वीकारावा लागला. फॉलोऑन नंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 2 बाद 232 धावा जमविल्या. तत्पूर्वी त्यांचा पहिला डाव 266 धावांत आटोपला. फिरकी गोलंदाज स्नेह राणाने 77 धावांत 8 गडी बाद केले. सुने लुसने द. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात शतक झळकाविले.
या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 603 धावांची विक्रमी धावसंख्या नोंदविल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 236 या धावसंख्येवरुन रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित 6 गडी 30 धावांत बाद झाले. भारताची फिरकी गोलंदाज स्नेह राणाने दक्षिण आफ्रिकेची शेपूट झटपट गुंडाळले. राणाच्या फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर अधिकवेळ राहता आले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात लूसने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 65 तर कॅपने 8 चौकारांसह 74 तसेच डी. क्लर्कने 6 चौकारांसह 39 धावा जमविल्या. स्नेह राणाला दिप्ती शर्माकडून चांगली साथ मिळाली. दिप्तीने 47 धावांत 2 गडी बाद केले.
पहिल्या डावात भारताने 337 धावांची आघाडी घेतल्याने त्यांनी दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला. मात्र फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने चिवट फलंदाजी केली. कर्णधार वुलव्हर्ट आणि सुने लुस यांनी दमदार फलंदाजी करत दुसऱ्या गड्यासाठी 190 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी सलामीची बॉश्च 9 धावांवर बाद झाली. शतक पूर्ण झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने लुसचा त्रिफळा उडविला. तिने 18 चौकारांसह 109 धावा झळकाविल्या. तिसऱ्या दिवसाअखेर वुलव्हर्ट 12 चौकारांसह 93 तर कॅप 1 चौकारासह 15 धावांवर खेळत आहेत. भारतातर्फे हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून दक्षिण आफ्रिकेचा संघ अद्याप 105 धावांनी पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सोमवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी चिवट फलंदाजी करत भारताला विजयापासून रोखण्याचा प्रयत्न करेल. भारताने रविवारी खेळाच्या शेवटच्या सत्रात दुसरा नवा चेंडू घेतला. भारतीय गोलंदाजीच्या कामगिरीवरच या सामन्याचा निकाल अवलंबून राहिल.
संक्षिप्त धावफलक – भारत प. डाव 115.1 षटकात 6 बाद 603 डाव घोषित (शेफाली वर्मा 205, स्मृती मानधना 149, रॉड्रिग्ज 55, कौर 69, रिचा घोष 86, टकेर 2-141, डी. क्लर्क, सेखुखूने, मलाबा प्रत्येकी 1 बळी).
दक्षिण आफ्रिका प. डाव 84.3 षटकात सर्व बाद 266 (लूस 65, कॅप 74, बॉश्च 39, वुलव्हर्ट 20, डी. क्लर्क 39, स्नेह राणा 8-77, दिप्ती शर्मा 2-47).
द. आफ्रिका दु डाव 85 षटकात 2 बाद 232 (लुस 109, वुलव्हर्ट खेळत आहे 93, बॉश 9, कॅप खेळत आहे 15, दिप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर प्रत्येकी 1 बळी).
Home महत्वाची बातमी भारताकडून दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन
भारताकडून दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन
महिलांची एकमेव कसोटी : स्नेह राणाचे आठ बळी, सुने लुसचे दुसऱ्या डावात शतक वृत्तसंस्था/ चेन्नई येथे सुरु असलेल्या यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार दिवसांच्या एकमेव कसोटी सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारताकडून दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन स्वीकारावा लागला. फॉलोऑन नंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 2 बाद 232 धावा जमविल्या. तत्पूर्वी त्यांचा पहिला डाव 266 […]