शहरामध्ये मतदान जागृतीवर भर द्या
मनपा आयुक्तांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्याची सूचना आयुक्त पी. एन. लोकेश यांनी केली आहे. मागील निवडणुकीमध्ये ज्या बुथवर कमी मतदान झाले आहे, त्या बुथच्या परिसरात घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. महानगरपालिकेमध्ये बैठक घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत सूचना केली आहे. निवडणूक लवकरच जाहीर होईल. त्यासाठी विभागवार प्रत्येकाने जनजागृती करावी. मतदारयाद्या, मतदानकार्ड वितरणाबाबतही दक्षता घ्यावी. जेणेकरून कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले. मनपाच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांना निवडणुकीबाबत सर्व त्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत यावेळी मतदान अधिक होईल याकडे लक्ष द्या, त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला महानगरपालिकेतील महसूल, सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी शहरामध्ये मतदान जागृतीवर भर द्या
शहरामध्ये मतदान जागृतीवर भर द्या
मनपा आयुक्तांची अधिकाऱ्यांना सूचना बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्याची सूचना आयुक्त पी. एन. लोकेश यांनी केली आहे. मागील निवडणुकीमध्ये ज्या बुथवर कमी मतदान झाले आहे, त्या बुथच्या परिसरात घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. महानगरपालिकेमध्ये बैठक घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत सूचना […]
