शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात ड्रोन उडवणे महागात पडले

सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. दररोज सोशल मीडियावर युजर्स रिल्स बनवून टाकतात. अनेकदा हे रिल्स बनवणे महागात पडते. शिर्डीत असेच काहीसे घडले आहे. मुंबईच्या एका तरुणाला शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ड्रोन उडवणे महागात पडले

शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात ड्रोन उडवणे महागात पडले

सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. दररोज सोशल मीडियावर युजर्स रिल्स बनवून टाकतात. अनेकदा हे रिल्स बनवणे महागात पडते. शिर्डीत असेच काहीसे घडले आहे. मुंबईच्या एका तरुणाला शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ड्रोन उडवणे महागात पडले असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक बाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात.

मंदिर प्रशासन आणि पोलीस भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेतात. काही अघटित घडू नये या साठी सुरक्षा व्यवस्था कडक आहे. साई बाबा मंदिर परिसरात ड्रोन उडवणे हे कायदेशीर बंदी आहे.

तरीही मुंबईच्या देव दोडिया नावाच्या तरुणाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिल्स बनवण्यासाठी साईबाबा मंदिर जवळ ड्रोन उडवले. त्याने हे ड्रोन मंदिराजवळ असलेल्या एका हॉटेलच्या टेरेस वरून उडवले.
मंदिराजवळ ड्रोन उडताना पाहून पोलीस सक्रिय झाले आणि शिर्डी पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला. 

Edited By- Priya DIxit 

 

Go to Source