बळ्ळारी नाला परिसरात पूरस्थिती कायम

भातपिके अद्याप पाण्याखालीच : पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ : शेतवडीत पाणी साचल्याने पिकांना धोका वार्ताहर /सांबरा तालुक्यासह सर्वत्र पावसाची संततधार सुरूच असून बळळारी नाल्याच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे बळळारी नाला परिसरामध्ये पूरपरिस्थिती कायम असून भातपिके अद्याप पाण्याखालीच आहेत. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, कणबर्गी, कलखांब, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मुचंडी, खनगाव, सुळेभावी आदी परिसरातील भातपिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच सांबरा, बाळेकुंद्री […]

बळ्ळारी नाला परिसरात पूरस्थिती कायम

भातपिके अद्याप पाण्याखालीच : पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ : शेतवडीत पाणी साचल्याने पिकांना धोका
वार्ताहर /सांबरा
तालुक्यासह सर्वत्र पावसाची संततधार सुरूच असून बळळारी नाल्याच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे बळळारी नाला परिसरामध्ये पूरपरिस्थिती कायम असून भातपिके अद्याप पाण्याखालीच आहेत. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, कणबर्गी, कलखांब, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मुचंडी, खनगाव, सुळेभावी आदी परिसरातील भातपिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, मोदगा येथून वाहणाऱ्या नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. या भागातील काही तलाव देखील भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून पूर्वभागामध्ये रोप लागवडीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. चिखल करणे, रोप लावणे, मजुरांची जमवाजमव करणे आदी कामांमध्ये शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या रोप लागवड वगळता इतर कामांना पावसामुळे ब्रेक लागला आहे. तर सततच्या पावसामुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून रस्त्यावरील लोकांची वर्दळ कमी झाली आहे.