निपाणीतील दोन चोरट्यांकडून चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त

एपीएमसी पोलिसांची कारवाई : पोलीस आयुक्त बोरसे यांची माहिती बेळगाव : निपाणी येथील दोन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून चोरीच्या पाच दुचाकी एपीएमसी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तीन मोटारसायकली, दोन स्कूटी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सैफअली शेरअली नगारजी (वय 25) राहणार दर्गा गल्ली, निपाणी, नेहान ऊर्फ अनिश मोहसीन मुजावर (वय 18) […]

निपाणीतील दोन चोरट्यांकडून चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त

एपीएमसी पोलिसांची कारवाई : पोलीस आयुक्त बोरसे यांची माहिती
बेळगाव : निपाणी येथील दोन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून चोरीच्या पाच दुचाकी एपीएमसी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तीन मोटारसायकली, दोन स्कूटी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सैफअली शेरअली नगारजी (वय 25) राहणार दर्गा गल्ली, निपाणी, नेहान ऊर्फ अनिश मोहसीन मुजावर (वय 18) राहणार भीमनगर, निपाणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सैफअली हा चिकन दुकानात काम करतो. तर नेहान गवंडीकाम करतो. या जोडगोळीजवळून 1 लाख 25 हजार रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी, उपनिरीक्षक एस. आर. मुत्तती, एम. ए. पाटील, बसवराज नरगुंद, खादरसाब खानम्मन्नावर, गोविंदप्पा पुजार, रफिक मुजावर, रमेश पाटील, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींनी शनिवारी ही कारवाई केली. कंग्राळी खुर्द येथील सतीश मल्लाप्पा मुतगेकर यांची केए 22 वाय 6732 क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडरची चोरी झाली होती. 24 डिसेंबर 2025 रोजी यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केए 22 वाय 6732 क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर, दोन सुझुकी अॅक्सेस, दोन स्प्लेंडर प्लस या जोडगोळीजवळून जप्त केल्या आहेत. महादेव रोड, कंग्राळी खुर्द येथे चोरी करण्यात आलेल्या एका मोटारसायकलचा शोध घेताना जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.