पिरनवाडीनजीक रस्त्यावर ऑईल सांडल्याने पाच दुचाकीस्वार घसरून जखमी
बेळगाव : रस्त्यावर पडलेल्या ऑईलमुळे पाच दुचाकीस्वार घसरून पडून किरकोळ जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनातील ऑईल गळतीमुळे ऑईल रस्त्यावर पसरले. त्यानंतर बेळगाव-खानापूर मार्गावरील वाहने घसरण्यास सुरुवात झाली. बघता बघता पाच दुचाकीस्वार घसरून पडून किरकोळ जखमी झाले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ऑईल पडलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स उभे केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत पार पडली.
Home महत्वाची बातमी पिरनवाडीनजीक रस्त्यावर ऑईल सांडल्याने पाच दुचाकीस्वार घसरून जखमी
पिरनवाडीनजीक रस्त्यावर ऑईल सांडल्याने पाच दुचाकीस्वार घसरून जखमी
बेळगाव : रस्त्यावर पडलेल्या ऑईलमुळे पाच दुचाकीस्वार घसरून पडून किरकोळ जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनातील ऑईल गळतीमुळे ऑईल रस्त्यावर पसरले. त्यानंतर बेळगाव-खानापूर मार्गावरील वाहने घसरण्यास सुरुवात झाली. बघता बघता पाच दुचाकीस्वार घसरून पडून किरकोळ जखमी झाले आहेत. हा […]
