राज्यात उद्यापासून मासेमारी बंदी लागू

राज्यात उद्यापासून मासेमारी बंदी लागू

पणजी : उद्या शनिवार दि. 1 जूनपासून मासेमारी बंदी लागू होणार असून ती सुमारे 2 महिने म्हणजे 31 जुलैपर्यंत चालणार आहे. या कालावधीत गोव्यातील समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली असून अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छिमारी खात्यातर्फे पाळत ठेवली जाणार आहे. त्यानंतर दि. 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. मासळीचे उत्पादन, प्रजनन वाढावे म्हणून ही बंदी असून ती वार्षिक आहे. या दोन महिन्यांत मासेमारी बंदीच्या काळात इतर राज्यांतून गोव्यात मासळी आयात करण्यात येते आणि तिचे दरही वाढलेले असतात. मासेमारीच्या व्यवसायात कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा इत्यादी परराज्यातील कामगारांचा गोव्यात मोठा भरणा असून ते आता दोन महिन्यांच्या सुटीवर आपापल्या गावाकडे निघणार आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटी उद्यापासून मालीम जेटी व इतर जेटीवर नांगऊन ठेवण्यात येणार आहे. दोन महिन्याच्या काळात बोटींची दुऊस्ती, रंगकाम, जाळी दुऊस्ती व इतर अनेक कामे करण्यात येणार आहेत. या काळात मासळीचे प्रमाण बाजारात मर्यादीत स्वऊपात असल्याने दर चढेच असतात. तसेच मासळी ताजी मिळत नाही, तर ती बर्फातील किंवा रसायनाद्वारे टिकवलेली असते. ती आरोग्यदायी नसते. याकाळात लोक अंडी, चिकन, सुक्या मासळीकडे तसेच रापण, मानशीच्या मासळीकडे मोर्चा वळवतात. गळ टाकून मासे पकडून खाणाऱ्यांच्या संख्येतही या काळात बरीच वाढ होते.