राज्यात 1 जूनपासून मासेमारी बंदी

मच्छीमारी खात्याकडून आदेश जारी : मासळीचे प्रजनन वाढविणे उद्दिष्ट पणजी : मासळीचे संवर्धन व्हावे म्हणून मासेमारी बंदी घालण्यात येत असून पावसाळी दोन महिन्यात मासळीचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते म्हणून त्या कालावधीत मासेमारी रोखण्यात येते. जेणेकऊन वर्षभर मासळी मिळावी आणि तिची कमतरता भासू नये म्हणून दरवर्षी बंदी घालण्यात येते. या बंदीमुळे मासळीचे अस्तित्व टिकून राहते आणि […]

राज्यात 1 जूनपासून मासेमारी बंदी

मच्छीमारी खात्याकडून आदेश जारी : मासळीचे प्रजनन वाढविणे उद्दिष्ट
पणजी : मासळीचे संवर्धन व्हावे म्हणून मासेमारी बंदी घालण्यात येत असून पावसाळी दोन महिन्यात मासळीचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते म्हणून त्या कालावधीत मासेमारी रोखण्यात येते. जेणेकऊन वर्षभर मासळी मिळावी आणि तिची कमतरता भासू नये म्हणून दरवर्षी बंदी घालण्यात येते. या बंदीमुळे मासळीचे अस्तित्व टिकून राहते आणि उत्पादन वाढते म्हणून बंदी काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी मच्छीमारी खात्यातर्फे गस्तीनौकांना पाचारण कऊन टेहळणी केली जाते, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली. या मासेमारी बंदीमुळे गोव्यातील विविध मासळी मार्केटमध्ये ताजी मासळी मिळत नाही आणि इतर राज्यातून ती आयात करण्यात येते. ती सुद्धा बर्फातीलच असते. मासळी कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे दर गगनाला भिडतात आणि ते सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जातात. त्यामुळे मासळी खवय्ये चिकन, मटण, अंडी याकडे वळतात किंवा सुक्या मासळीवर निभावून नेतात. अनेक लोक पावसाळी मासळी मिळण्यासाठी गळ टाकून बसतात. बंदी संपली की पुन्हा ताजी मासळी उपलब्ध होते आणि मग खवय्ये पुन्हा तिच्यावर तुटून पडतात व दरही मग कमी होतात.