Satara News : आधी मतदान, मगच लग्न”; फलटणच्या सोनवडीतील नववधूने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
फलटणच्या सोनवडीतील मतदानातील नववधूचा आदर्श
फलटण : आज ऋतुजा क्षीरसागर या नववधूचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतानाच, लोकशाहीप्रती तिच्या कर्तव्यभावनेचे प्रेरणादायी दर्शन घडले. विवाह मंडपात जाण्यापूर्वी ऋतुजा हिने फलटण तालुक्यातील सोनवडी येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.
लग्नाचा गजर, मंगलाष्टके आणि विधींची तयारी सुरू असतानाही “आधी मतदान, मगच लग्न” असा ठाम निर्णय घेत ऋतुजाने समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे. तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, विशेषतः तरुण मतदारांसाठी हा प्रेरणादायी संदेश ठरत आहे.
लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे, हे ऋतुजाने आपल्या कृतीतून अधोरेखित केले आहे. अशा प्रेरणादायी घटनांमुळे मतदानाबाबत जनजागृती वाढण्यास मदत होत असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
Home महत्वाची बातमी Satara News : आधी मतदान, मगच लग्न”; फलटणच्या सोनवडीतील नववधूने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
Satara News : आधी मतदान, मगच लग्न”; फलटणच्या सोनवडीतील नववधूने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
फलटणच्या सोनवडीतील मतदानातील नववधूचा आदर्श फलटण : आज ऋतुजा क्षीरसागर या नववधूचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतानाच, लोकशाहीप्रती तिच्या कर्तव्यभावनेचे प्रेरणादायी दर्शन घडले. विवाह मंडपात जाण्यापूर्वी ऋतुजा हिने फलटण तालुक्यातील सोनवडी येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून […]
