18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून

27 जूनपासून राज्यसभेचे सत्र : 3 जुलैपर्यंत चालणार : नवीन खासदार घेणार शपथ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट टाकत यासंबंधी माहिती दिली. या अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील आणि सभागृहाच्या अध्यक्षांचीही निवड केली जाईल. […]

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून

27 जूनपासून राज्यसभेचे सत्र : 3 जुलैपर्यंत चालणार : नवीन खासदार घेणार शपथ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट टाकत यासंबंधी माहिती दिली. या अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील आणि सभागृहाच्या अध्यक्षांचीही निवड केली जाईल. त्यानंतर संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आयोजन करण्यात येईल. राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 जुलैपर्यंत चालणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा  निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने बहुमत मिळवत सत्ता हाती घेतली आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले असून त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाची निवड व खातेवाटपही केले आहे. नवनियुक्त मंत्र्यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला प्रारंभ केला आहे. आता संसद अधिवेशनानंतर कामकाजाला गती येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. यामध्ये नवीन सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या कामाची रुपरेषा सादर करतील. तसेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी संसदेत आपल्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांची ओळख करून देणार असल्याचे समजते.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आक्रमक विरोधक विविध मुद्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील.