मॉर्निंग वॉकला निघालेल्या भाजप नगरसेवकावर गोळीबार
उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. फिरोजाबाद येथे भाजपचे नगरसेवक अलीम भोला यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या.
अलीम भोला हे मॉर्निगवॉकला गेले असता लेबरकॉलोनी च्या पुलावर गोळी झाडली. ते या गोळीबारात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना आग्रा येथे रेफर केले.
मिळालेल्या माहितीनुसार, लेबरकॉलोनीतील भाजपचे नगरसेवक अलीम उर्फ भोला हे नेहमी प्रमाणे मॉर्निगवॉकला गेले असता ओव्हरब्रीजवर अज्ञाताने त्यांच्यावर गोळी झाडली.
या हल्ल्यात त्यांच्या पायात आणि पोटात गोळी लागली असून ते जखमी झाले. त्यांना तातडीनं पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्यावर गोळी झाडण्याचे कारण आणि आरोपीचा अद्याप कारण कळू शकला नाही. पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे.
Edited by – Priya Dixit