खोल गटारीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

मनपा-अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न बेळगाव : जुन्या धारवाड रोडवरील गटारीमध्ये पडलेल्या एका कुत्र्याला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे जीवदान मिळाले. या ठिकाणी असणाऱ्या गटारी अत्यंत खोल आहेत. त्यामध्ये मंगळवारी पहाटे एक कुत्रा पडला. परंतु त्याला वर येता येणे अशक्य झाले. त्याच्या सततच्या भुंकण्यामुळे लोकांनी पाहणी केली व याची माहिती महानगरपालिकेला दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला बाहेर काढले. […]

खोल गटारीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

मनपा-अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न
बेळगाव : जुन्या धारवाड रोडवरील गटारीमध्ये पडलेल्या एका कुत्र्याला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे जीवदान मिळाले. या ठिकाणी असणाऱ्या गटारी अत्यंत खोल आहेत. त्यामध्ये मंगळवारी पहाटे एक कुत्रा पडला. परंतु त्याला वर येता येणे अशक्य झाले. त्याच्या सततच्या भुंकण्यामुळे लोकांनी पाहणी केली व याची माहिती महानगरपालिकेला दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला बाहेर काढले. जुन्या धारवाड रस्त्यावर अजूनही बरीच कामे अर्धवट आहेत. या रस्त्याच्या शेजारीच मातीचे ढीग तसेच पडून आहेत. गटारी खोल आहेत. त्या गटारींवर स्लॅब घालण्यात आले नाही. त्यामुळे त्यामध्ये कुत्रा किंवा जनावर पडल्यास त्याच्या जीवाला धोका आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी या रस्त्यावरील गटारींची दुरुस्ती करून स्लॅब घालावा, अशी मागणी होत आहे.