विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशमनकडून जीवदान

बेळगाव : तब्बल 35 फूट खोल विहिरीत पडलेल्या पाळीव कुत्र्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले आहे. रविवार दि. 11 फेब्रुवारी रोजी हिंदवाडी, गणेश मार्ग परिसरात ही घटना घडली आहे. विराज पोवार यांचा पाळीव कुत्रा विहिरीत पडला. सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी या कुत्र्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. विहिरीत शेवाळ धरल्यामुळे या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाच्या […]

विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशमनकडून जीवदान

बेळगाव : तब्बल 35 फूट खोल विहिरीत पडलेल्या पाळीव कुत्र्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले आहे. रविवार दि. 11 फेब्रुवारी रोजी हिंदवाडी, गणेश मार्ग परिसरात ही घटना घडली आहे. विराज पोवार यांचा पाळीव कुत्रा विहिरीत पडला. सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी या कुत्र्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. विहिरीत शेवाळ धरल्यामुळे या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे किरण पाटील, अप्पय्या हिरेमठ, बसवराज पुजेरी, प्रकाश शिंदे आदी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत उतरून या जवानांनी कुत्र्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर तो संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आला.