येळ्ळुरात भात गंजीला आग लागून सव्वा लाख रुपयांचे नुकसान

बेळगाव : येळ्ळूर शिवारातील एक एकर जमिनीत पिकविण्यात आलेल्या भाताच्या गंजीला आग लागली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून आगीत शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. मच्छे येथील नागेश मऱ्याप्पा हावळ यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. येळ्ळूर परिसरात त्यांनी एक एकर शेतजमिनीत बासमती भात पिकवले होते. दोन ट्रॅक्टर भरेल इतके भात कापून […]

येळ्ळुरात भात गंजीला आग लागून सव्वा लाख रुपयांचे नुकसान

बेळगाव : येळ्ळूर शिवारातील एक एकर जमिनीत पिकविण्यात आलेल्या भाताच्या गंजीला आग लागली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून आगीत शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. मच्छे येथील नागेश मऱ्याप्पा हावळ यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. येळ्ळूर परिसरात त्यांनी एक एकर शेतजमिनीत बासमती भात पिकवले होते. दोन ट्रॅक्टर भरेल इतके भात कापून त्याची गंजी घातली होती. वाळल्यानंतर मळणी करणार होते. मात्र, त्याआधीच गंजीला आग लागली आहे. गुरुवार दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली असून सुमारे सव्वालाख रुपये किमतीचे भात जळून खाक झाले आहे.