ठाण्यात ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या दुकानात आग, कोणतीही जीवित हानी नाही

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या दुकानात रविवारी रात्री 23 फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली रविवारी रात्री 10 :30 वाजेच्या सुमारास वंजारपट्टी नाका येथील वेदांत हॉस्पिटल जवळ आग लागली.

ठाण्यात ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या दुकानात आग, कोणतीही जीवित हानी नाही

Thane News: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या दुकानात रविवारी रात्री 23 फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली  रविवारी रात्री 10 :30 वाजेच्या  सुमारास वंजारपट्टी नाका  येथील वेदांत हॉस्पिटल जवळ आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.

ALSO READ: ठाणे जिल्ह्यात कैद्याने त्याच्या कुटुंबासह न्यायालयात पोलिसांवर हल्ला केला,गुन्हा दाखल
आगीचे फोटो व्हायरल झाले असून आगीमुळे वाहनांची वाहतूक कोंडी झाली. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने अग्निशमन कार्यात मदत करण्यासाठी अतिरिक्त  अग्निशमन दलाचे  पाच बंब पाठवले. 

अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुलिंग करण्याचे काम सकाळपर्यंत सुरु होते. 

ALSO READ: ठाण्यात चित्रपट उद्योगात काम देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार
आगीचे कारण अद्याप कळू शकले माही. आगीची चौकशी सुरु आहे अशी माहिती बीएनएमसी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.सुदैवाने या मध्ये कोणतीही जनहानी झालेली नाही. आगीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

Edited By – Priya Dixit

ALSO READ: वडाळा येथे भरधाव कारने धडक दिल्याने 18 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

Go to Source