येळ्ळूर शिवारात पुन्हा गवतगंजींना आग

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : समाजकंटकांचे कृत्य वार्ताहर /येळ्ळूर येळ्ळूर येथे पुन्हा तीन गवतगंजींना समाजकंटकांनी आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोंडी शिवारामध्ये ही घटना घडली असून यापूर्वी भातांच्या गंजींना समाजकंटकांनी आग लावली होती. त्यानंतर आता गवतगंजींनाही आग लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोंडी शिवारात असलेल्या श्रीधर धामणेकर, […]

येळ्ळूर शिवारात पुन्हा गवतगंजींना आग

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : समाजकंटकांचे कृत्य
वार्ताहर /येळ्ळूर
येळ्ळूर येथे पुन्हा तीन गवतगंजींना समाजकंटकांनी आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोंडी शिवारामध्ये ही घटना घडली असून यापूर्वी भातांच्या गंजींना समाजकंटकांनी आग लावली होती. त्यानंतर आता गवतगंजींनाही आग लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोंडी शिवारात असलेल्या श्रीधर धामणेकर, इंगळे तसेच आणखी एका शेतकऱ्याच्या गवतगंजीला आग लावण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनवारांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना समाजकंटकांनी गवतगंजीला आग लावल्याने संताप व्यक्त होत आहे. अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
समाजकंटकांना धडा शिकवा
दोन महिन्यांपूर्वी भाताच्या गंजांना समाजकंटकांनी आग लावली होती. एकाच दिवशी 11 भाताच्या गंज्या जळाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा ही घटना त्या परिसरातच घडली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनीच माथेफिरु अथवा अशा समाजकंटकांवर लक्ष ठेवून त्याला धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही होत आहे.