उद्यमबागमध्ये सर्व्हिस सेंटरला आग

बेळगाव : उद्यमबाग येथील एका कार सर्व्हिस सेंटरला आग लागून सुमारे 20 लाखांची हानी झाली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत यासंबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अरिस्टो ऑटोक्राफ्ट या सर्व्हिस सेंटरमध्ये दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास आग दिसून आली. शॉर्टसर्किटने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाला या […]

उद्यमबागमध्ये सर्व्हिस सेंटरला आग

बेळगाव : उद्यमबाग येथील एका कार सर्व्हिस सेंटरला आग लागून सुमारे 20 लाखांची हानी झाली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत यासंबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अरिस्टो ऑटोक्राफ्ट या सर्व्हिस सेंटरमध्ये दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास आग दिसून आली. शॉर्टसर्किटने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाचे साहाय्यक अधिकारी ए. एस. माळोदे, बाबू सामने, राजू मिटगार, सदानंद राचण्णावर आदींनी घटनास्थळी बंबासह दाखल होऊन आग आटोक्यात आणली. तत्पूर्वी अग्निशमन उपकरणाचा वापर करून स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला.