वडगावात स्क्रॅप अड्डायाला आग
पत्रे, लोखंड, रद्दी जळून नुकसान : अग्निशमनासाठी पाच बंबांचा वापर
बेळगाव : ढोर गल्ली, वडगाव येथील एका स्क्रॅपच्या अड्डायाला आग लागली. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यासाठी तब्बल पाच बंब वापरण्यात आले. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्क्रॅपच्या अड्डायातील पत्रे, लोखंड, रद्दी व वाहनांचे सुटेभाग आदींनी पेट घेतला. लागलीच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. इनचार्ज फायर ऑफिसर आय. वाय. मडगेर, असिस्टंट फायर ऑफिसर अरुण माळोदे, बाळेश बडीगेर, अर्जुन दयण्णावर, सदानंद राचण्णावर, सिद्धाप्पा राचण्णावर आदींसह 13 हून अधिक जवान घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी एकापाठोपाठ एक पाच बंब मागविण्यात आले. शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी रात्री शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी वडगावात स्क्रॅप अड्डायाला आग
वडगावात स्क्रॅप अड्डायाला आग
पत्रे, लोखंड, रद्दी जळून नुकसान : अग्निशमनासाठी पाच बंबांचा वापर बेळगाव : ढोर गल्ली, वडगाव येथील एका स्क्रॅपच्या अड्डायाला आग लागली. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यासाठी तब्बल पाच बंब वापरण्यात आले. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्क्रॅपच्या अड्डायातील पत्रे, लोखंड, […]