जोगमठ-गवळीवाड्यावरील घराला आग
संसारोपयोगी वस्तू जळून खाक : रोख 50 हजाराच्या रकमेचेही नुकसान
खानापूर : तालुक्यातील निलावडे ग्राम पंचायत क्षेत्रातील जोगमठ येथील गवळीवाड्यावरील झोपडीवजा घराला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. यात 50 हजार रुपयांची रक्कम खाक झाली असून संसारोपयोगी साहित्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. याबाबतची माहिती अशी की, निलावडे ग्रा. पं. क्षेत्रातील जोगमठ गवळीवाड्यावील जयवंत बाबू पाटील यांच्या झोपडीवजा घराला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. संपूर्ण घर हे गवताचे आणि बांबूचे असल्याने आगीने पेट घेतला. त्यामुळे घराचा मागील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गवळीवाड्यावरील गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यात जयवंत पाटील यांनी घरात ठेवलेली रोख पन्नास हजार रु. तसेच इतर संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शैक्षणिक साहित्यासह इतर वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे जयंवत पाटील यांचे मोठे नुकसान झाले. पाटील हे गवळी असून ते जनावरे पाळण्याचा व्यवसाय करतात. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा महसूल खात्याने पंचनामा करून मदत मिळवून देण्यात यावी, अशी मागणी निलावडे ग्रा. पं. चे सदस्य विनायक मुतगेकर यांनी केली आहे.
Home महत्वाची बातमी जोगमठ-गवळीवाड्यावरील घराला आग
जोगमठ-गवळीवाड्यावरील घराला आग
संसारोपयोगी वस्तू जळून खाक : रोख 50 हजाराच्या रकमेचेही नुकसान खानापूर : तालुक्यातील निलावडे ग्राम पंचायत क्षेत्रातील जोगमठ येथील गवळीवाड्यावरील झोपडीवजा घराला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. यात 50 हजार रुपयांची रक्कम खाक झाली असून संसारोपयोगी साहित्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. याबाबतची माहिती अशी की, निलावडे ग्रा. पं. क्षेत्रातील जोगमठ गवळीवाड्यावील […]
