साबरमती एक्स्प्रेसमध्ये आगीची दुर्घटना

जनरल डब्यात आग लागल्याने तारांबळ गैरसोय्  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जयपूर-दिल्ली रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या वाराणसी-लखनौ साबरमती एक्स्प्रेसमध्ये आगीनंतर धुराचे लोट उठल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बुधवारी दुपारी दौसाजवळ ही घटना घडली असून जनरल डब्यातून प्रचंड धूर निघत होता. हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. रेल्वे गेट क्रमांक 168 च्या गेटमनला चाकातून धूर निघताना दिसला. त्यानंतर इमर्जन्सी ब्रेक लावून […]

साबरमती एक्स्प्रेसमध्ये आगीची दुर्घटना

जनरल डब्यात आग लागल्याने तारांबळ गैरसोय् 
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जयपूर-दिल्ली रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या वाराणसी-लखनौ साबरमती एक्स्प्रेसमध्ये आगीनंतर धुराचे लोट उठल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बुधवारी दुपारी दौसाजवळ ही घटना घडली असून जनरल डब्यातून प्रचंड धूर निघत होता. हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. रेल्वे गेट क्रमांक 168 च्या गेटमनला चाकातून धूर निघताना दिसला. त्यानंतर इमर्जन्सी ब्रेक लावून एक्स्प्रेस गाडी तात्काळ भांक्री स्टेशनवर थांबवण्यात आली. त्याठिकाणी जवळपास 15 मिनिटे रेल्वेगाडी थांबवून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परिणामत: या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. गेटमनने वेळीच आगीची माहिती दिल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला. या दुर्घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे.