गोवावेस येथील पेट्रोलपंपावर आगीची दुर्घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
गोवावेस येथील दोड्डाण्णावर पेट्रोलपंपच्या केबिनला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. केबिनमधील प्लास्टिक बॅनर व इतर साहित्याने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. तात्काळ अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. परंतु, यामुळे गोवावेस परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.
मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या दो•ण्णावर पेट्रोलपंपाशेजारील केबिनला अचानक आग लागली. आजूबाजूला झाडांचा पालापाचोळा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. पेट्रोलपंपाचे जुने बॅनर, तसेच इतर प्लास्टिक साहित्य यामुळे आग वाढत गेली. स्थानिकांनी जवळच असलेल्या अग्निशमन विभागाला संपर्क साधला. तात्काळ घटनास्थळी दाखल होत जवानांनी आग विझविली. यामध्ये केबिनमधील साहित्याचे नुकसान झाले. केबिनमध्ये वीजपुरवठा बंद असतानाही आग लागली कशी? याची पाहणी अग्निशमन अधिकाऱ्यांनी केली.
Home महत्वाची बातमी गोवावेस येथील पेट्रोलपंपावर आगीची दुर्घटना
गोवावेस येथील पेट्रोलपंपावर आगीची दुर्घटना
प्रतिनिधी/ बेळगाव गोवावेस येथील दोड्डाण्णावर पेट्रोलपंपच्या केबिनला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. केबिनमधील प्लास्टिक बॅनर व इतर साहित्याने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. तात्काळ अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. परंतु, यामुळे गोवावेस परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या दो•ण्णावर पेट्रोलपंपाशेजारील केबिनला अचानक आग लागली. आजूबाजूला […]
