सांगलीच्या तोतया पत्रकाराविरुद्ध बेळगावात एफआयआर
खासगी वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी
बेळगाव : खासगी वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत बेळगाव परिसरात फिरणाऱ्या जत (जि. सांगली) तालुक्यातील एका तोतया पत्रकारावर बेळगाव येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे. रमजान सुभान मुजावर (वय 40) मूळचा राहणार संख, ता. जत, जि. सांगली, सध्या राहणार अथणी असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर भा.दं.वि 419, 417, 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून टीव्ही-9 चे सहदेव माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल झाला आहे. आपण टीव्ही-9 मराठीचा पत्रकार असल्याचे सांगत रमजान सर्वत्र वावरत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मंगळवारी कन्नड साहित्य भवनजवळ त्याला पकडून मार्केट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी सांगलीच्या तोतया पत्रकाराविरुद्ध बेळगावात एफआयआर
सांगलीच्या तोतया पत्रकाराविरुद्ध बेळगावात एफआयआर
खासगी वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी बेळगाव : खासगी वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत बेळगाव परिसरात फिरणाऱ्या जत (जि. सांगली) तालुक्यातील एका तोतया पत्रकारावर बेळगाव येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे. रमजान सुभान मुजावर (वय 40) मूळचा राहणार संख, ता. जत, जि. सांगली, सध्या राहणार अथणी असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर […]