वेर्णा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना अर्थसाह्य द्यावे
बिहारचे राज्यपाल आर्लेकर यांची विनंती
पणजी : वेर्णा येथे गत शनिवारी एका बसने चिरडल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख ऊपये अर्थसाह्य देण्यात यावे, अशी विनंती बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे दूरध्वनीवरून केलेल्या बोलणीदरम्यान राज्यपालांनी सदर विनंती केली आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देतानाच जखमींना चांगले उपचार देण्याचीही विनंती आर्लेकर यांनी केली आहे. तसेच कामगारांना अमानवी वागणूक देणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सदर घटनेची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना दिले. या अपघातात मृत पावलेले सदर कामगार हे बिहारच्या पूर्व चंपारण जिह्यातील आहेत. त्यात विनोद सिंग (44), अनिल महातो (30), रमेश महातो (41) आणि राजेंद्र महातो (50) यांचा समावेश आहे. त्याशिवाय दिनेश कुमार सिंग, तुना महतो, राजेश कुमार मंडल आणि नरेश सिंग हे गंभीर जखमी झालेले आहेत.
Home महत्वाची बातमी वेर्णा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना अर्थसाह्य द्यावे
वेर्णा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना अर्थसाह्य द्यावे
बिहारचे राज्यपाल आर्लेकर यांची विनंती पणजी : वेर्णा येथे गत शनिवारी एका बसने चिरडल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख ऊपये अर्थसाह्य देण्यात यावे, अशी विनंती बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे दूरध्वनीवरून केलेल्या बोलणीदरम्यान राज्यपालांनी सदर विनंती केली आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देतानाच जखमींना चांगले उपचार देण्याचीही […]