अखेर शहरांतर्गत रस्त्याच्या दुरुस्ती कामास सुरुवात
खानापुरातील मराठा मंडळ ते करंबळ क्रॉस रस्ताच वाहतुकीस योग्य
खानापूर : खानापूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाची गेल्या पाच वर्षापासून दुर्दशा झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा रास्तारोकोसह इतर आंदोलने झाली होती. मात्र सरकारला काही जाग येत नव्हती. सध्या करंबळसह तालुक्यातील अनेक गावच्या महालक्ष्मी यात्रा होणार आहेत. यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी हा रस्ता वाहतुकीस योग्य व्हावा, यासाठी धारवाड येथील महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन मराठा मंडळ महाविद्यालय ते करंबळ क्रॉस या साडेचार कि. मी. च्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास शुक्रवारी सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव-गोवा नव्याने महामार्ग तयार झाल्यानंतर शहरातील हा रस्ता कोणाच्या अखत्यारीत येतो, यावरुन काही वर्षे वाद सुरू होता. यापूर्वी हा रस्ता महामार्गाच्या अखत्यारीत येत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाने दुरुस्त करावा, अशी भूमिका घेतली होती. महामार्ग प्राधिकरणाने एकात्मिक विकास योजनेच्या अंतर्गत हा रस्ता विकसित करण्याची योजना आखली होती. यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम थांबले होते. येत्या काही महिन्यात या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात येणार असून जॅकवेलजवळील मलप्रभा नदीवरील पूलही नव्याने बांधण्यात येणार आहे. मराठा मंडळ महाविद्यालय ते करंबळ क्रॉस दुपदरी सिमेंटचा रस्ता तयार करण्याची योजना आहे. या योजनेस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची मंजुरीही मिळाली आहे. मराठा मंडळ ते करंबळ क्रॉस रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या विकासासाठी 40 कोटीचा आराखडा
आमदार विठ्ठल हलगेकर आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन एकात्मिक विकास योजनेच्या अंतर्गत या रस्त्याच्या विकासासाठी 40 कोटीचा आराखडा तयार केला असून या आराखड्यास मंजुरी मिळणार आहे. मात्र सध्या यात्रोत्सवांचा काळ असल्याने मोठ्याप्रमाणात बाहेरील भक्त दर्शनासाठी येणार असल्याने शहरांतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. यासाठी अशोका बिल्डकॉन या कंपनीला या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी अखेर शहरांतर्गत रस्त्याच्या दुरुस्ती कामास सुरुवात
अखेर शहरांतर्गत रस्त्याच्या दुरुस्ती कामास सुरुवात
खानापुरातील मराठा मंडळ ते करंबळ क्रॉस रस्ताच वाहतुकीस योग्य खानापूर : खानापूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाची गेल्या पाच वर्षापासून दुर्दशा झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा रास्तारोकोसह इतर आंदोलने झाली होती. मात्र सरकारला काही जाग येत नव्हती. सध्या करंबळसह तालुक्यातील अनेक गावच्या महालक्ष्मी यात्रा होणार आहेत. यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी हा रस्ता वाहतुकीस योग्य […]