अखेर मनपाच्या कौन्सिल सेक्रेटरी ठरल्या राजकारणाच्या बळी

उमा बेटगेरी यांच्यावर निलंबनाची कारवाई बेळगाव : महानगरपालिकेतील तत्कालीन कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सरकारकडून आदेश आल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेतील राजकारणाचा त्या बळी ठरल्याची जोरदार चर्चा सध्या  सुरू झाली आहे. महानगरपालिकेतील फाईल गायब प्रकरण चिघळले होते. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. करवाढीबाबतची ती फाईल नगरविकास खात्याकडे […]

अखेर मनपाच्या कौन्सिल सेक्रेटरी ठरल्या राजकारणाच्या बळी

उमा बेटगेरी यांच्यावर निलंबनाची कारवाई
बेळगाव : महानगरपालिकेतील तत्कालीन कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सरकारकडून आदेश आल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेतील राजकारणाचा त्या बळी ठरल्याची जोरदार चर्चा सध्या  सुरू झाली आहे. महानगरपालिकेतील फाईल गायब प्रकरण चिघळले होते. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. करवाढीबाबतची ती फाईल नगरविकास खात्याकडे पाठवून दिल्यानंतर त्यावर तारखेचा उल्लेख चुकला होता. त्यावरून महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अशोक दुडगुंटी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटाने केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध केला. त्या फाईलवर महापौरांनीही स्वाक्षरी केली होती. त्यामुळे माजी महापौर शोभा सोमणाचे यादेखील तितक्याच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला.
काँग्रेस नगरसेवकांच्या या आरोपानंतर कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांच्याकडील फाईल गायब झाली. त्याला सर्वस्वी बेटगेरी यांनाच जबाबदार धरण्यात आले. त्यानंतर त्यांच्या विरोधात मार्केट पोलीस स्थानकामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण चांगलेच तापले होते. आयुक्त जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच महापौरही जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे या सर्व राजकारणात उमा बेटगेरी यांचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही हे प्रकरण चांगलेच लाऊन धरले. आमदार राजू सेठ, याचबरोबर नगरसेवकांनी भाजपच्या सत्ताधारी गटावर जोरदार आरोप केला. सर्वसाधारण सभा झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बैठक झाली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी फिर्याद दिली होती. एकूणच आरोप-प्रत्यारोपामुळे त्यावेळी वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणानंतर उमा बेटगेरी या दीर्घ रजेवर गेल्या होत्या. त्यानंतर त्यांची महसूल विभागामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता निलंबनाचा आदेश आला आहे.