अखेर बाजारातील सलगच्या घसरणीला विराम!

अंतिम सत्रात तेजी परतली : सेन्सेक्स 1293 तर निफ्टी 429 अंकांनी मजबूत वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय शेअर बाजारात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदरपासून काहीसे दबावाचे चित्र होते. पुढे अर्थसंकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतरही बाजारात घसरणीचे सत्र दिसून आले. यामुळे विदेशी गुंतवणूकदार नाराज असल्याचे चित्र होते. मात्र दरम्यान देशातील विविध कंपन्यांचे तिमाही अहवाल सादर करण्यात आले आहेत. या कारणास्तव […]

अखेर बाजारातील सलगच्या घसरणीला विराम!

अंतिम सत्रात तेजी परतली : सेन्सेक्स 1293 तर निफ्टी 429 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदरपासून काहीसे दबावाचे चित्र होते. पुढे अर्थसंकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतरही बाजारात घसरणीचे सत्र दिसून आले. यामुळे विदेशी गुंतवणूकदार नाराज असल्याचे चित्र होते. मात्र दरम्यान देशातील विविध कंपन्यांचे तिमाही अहवाल सादर करण्यात आले आहेत. या कारणास्तव भारतीय शेअर बाजार अखेरच्या सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत कामगिरी करत बंद झाले आहेत. सेन्सेक्सने 1293 अंकांची तर निफ्टीने 429 अंकांची झेप घेतली आहे.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स दिवसअखेर रिलायन्स इंडस्ट्रीज व ब्लू चिप या समभागांमधील तेजीमुळे मजबुतीसोबत बंद झाला. यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 1292.92 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 81,332.72 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 428.75 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 24,834.85 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांची कामगिरी
भारतीय बाजारात शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्समधील 30 पैकी 29 समभाग हे वधारले आहेत. यामध्ये भारती एअरटेल, अदानी पोर्ट, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि इन्फोसिस यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले.
तर सनफार्मा, एचसीएल टेक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयटीसी, टाटा मोर्ट्स, टायटन, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, स्टेट बँक, इंडसइंड बँक, एशियन पेन्ट्स, टीसीएस, पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन अॅण्ड टुब्रो, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग हे नफा कमाईत राहिले आहेत. नेस्ले इंडिया यांचे समभाग हे 0.07 टक्क्यांच्या हलक्या घसरणीसह बंद झाला आहे.
जागतिक बाजारातले चित्र
जागतिक बाजारांची स्थिती पाहिल्यास यामध्ये आशियातील बाजारात सियोल, शांघाय आणि हाँगकाँग यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. तर टोकीयोचे समभाग हे घसरणीत राहिले. युरोपीयन बाजारात सकारात्मक कल राहिल्याचा फायदाही भारतीय बाजाराला झाला आहे.
दरम्यान जागतिक बाजारात कच्चे तेल 0.40 टक्क्यांनी घसरुन ते 82.04 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी 2,605.49 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.