अखेर हार्दिक-नताशाचा घटस्फोट

चार वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय वृत्तसंस्था /वडोदरा टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री मॉडेल असलेली त्याची पत्नी नताशा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या, अखेर गुरुवारी हार्दिक आणि नताशा दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोघांनी चार वर्षांच्या संसारानंतर विभक्त […]

अखेर हार्दिक-नताशाचा घटस्फोट

चार वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय
वृत्तसंस्था /वडोदरा
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री मॉडेल असलेली त्याची पत्नी नताशा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या, अखेर गुरुवारी हार्दिक आणि नताशा दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोघांनी चार वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
हार्दिकने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस मी आणि नताशाने या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही हे नाते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता आम्हाला वाटतेय की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र अनुभवलेला आनंद व एकमेकांबद्दलचा आदर कायम स्मरणात असेल त्यामुळेच हा निर्णय घेणे कठीण होते.
आमचा 4 वर्षांचा संसार होता. आम्ही जरी वेगळे होत असलो तरीही आमचा मुलगा अगस्त्यला आम्ही आई-वडीलांचे प्रेम कमी पडू देणार नाही. आम्ही दोघेही त्याची काळजी घेऊ, अशी पोस्ट दोघांनीही केली आहे. दरम्यान, नताशाने मुलगा अगस्त्यसोबत मुंबई सोडल्याच्या वृत्तानंतर आणि त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या कयासांच्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.