आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल, अशी माहिती बीसीसीआयतर्फे देण्यात आली आहे. दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायरचा एक आणि एलिमिनेटरचा एक असे दोन सामने होण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेतील दुसरा क्वालिफयार सामना चेन्नईत होणार असल्याची माहिती आयपीएलच्या नियंत्रण मंडळाच्या बैठकीनंतर प्रवक्त्याने दिली आहे. आयपीएलच्या परंपरेनुसार गतवर्षीच्या विद्यमान विजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर सलामीचा आणि अंतिम सामना खेळवण्याचे ठरवले आहे. महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा आहे. बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक निश्चित केले असून आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन सामन्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. लवकरच आयपीएलच्या उर्वरित वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली जाईल.
Home महत्वाची बातमी आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईत
आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2024 च्या आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल, अशी माहिती बीसीसीआयतर्फे देण्यात आली आहे. दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायरचा एक आणि एलिमिनेटरचा एक असे दोन सामने होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेतील दुसरा क्वालिफयार सामना चेन्नईत होणार असल्याची माहिती आयपीएलच्या नियंत्रण मंडळाच्या बैठकीनंतर प्रवक्त्याने […]
