कर्नाटक-मुंबई यांच्यात अंतिम लढत
कूच बिहार स्पर्धेत तामिळनाडूचा केला 9 गड्यांनी पराभव
बेळगाव : बेळगाव येथे बीसीसीआय व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कूच बिहार चषक 19 वर्षाखालील उपांत्य फेरीचा सामन्यात कर्नाटकने तामिळकाडूचा दुसऱ्या डावात 9 गड्यांनी गड्यांनी पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामना कर्नाटनाचा मुबई बरोबर शिवमोगा येथे होणार आहे. बेळगावच्या केएससीए मैदानावर कूच बिहार चषक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या डावात तामिळनाडुने 54 षटकात सर्वगडीबाद 126 धावा केल्या. कर्नाटकाने पहिल्या 129.3 षटकात सर्व गडीबाद 418 धावा करून 292 धावांची आघाडी मिळविली. दुसऱ्या डावात तामिळनाडुने 70.5 षटकात सर्व गडीबाद 302 धावा केल्या. त्यात केटीए माधव प्रसादने 1 षटकार 11 चौकारांसह 118 धावा करून शतक झळकविले. त्याला श्रनीकने 2 षटकार 6 चौकारांसह 73, आंद्रे सिद्धार्थने 1 षटकार 2 चौकारांसह 33 धावा केल्या.
कर्नाटक संघातर्फे आगस्टेह राजुने 52 धावांत 4. धिरज गावडाने 94 धावांत 4 तर समर्थ एन. व हार्दिक राज यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केले. दुसऱ्या डावात तामिळकाडूने कर्नाटकाला 10 धावांचे सोपे आवाहन दिले. 10 धावाचे आवाहन घेताना कर्नाटकते 1.1 षटकात 1 गडीबाद 12 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात कार्तिक व हर्षल धर्मानी नाबाद 4 धावा केल्या. तामिळनाडू तर्फे बी. सचीन 1 गडीबाद केला. कांदीवली मुंबई सचीन तेंडोलकर जिमखाना मैदानावर येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशने पहिल्या डावात खेळताना 80 षटकात सर्व गडीबाद 250 धाव केल्या. मुंबईने पहिल्या डावात खेळताना 75 षटकात सर्व गडीबाद 307 धावा केल्या. मुंबईने उत्तर प्रदेशवर 57 धावांची आघाडी मिळवीली. दुसऱ्या डावात उत्तर प्रदेने 53.4 षटकात सर्व गडीबाद 187 धावा केल्या. 130 धावांचे आव्हान घेऊन खेळताना मुंबईने 21.3 षटकात 1 गडी बाद 133 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला.
Home महत्वाची बातमी कर्नाटक-मुंबई यांच्यात अंतिम लढत
कर्नाटक-मुंबई यांच्यात अंतिम लढत
कूच बिहार स्पर्धेत तामिळनाडूचा केला 9 गड्यांनी पराभव बेळगाव : बेळगाव येथे बीसीसीआय व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कूच बिहार चषक 19 वर्षाखालील उपांत्य फेरीचा सामन्यात कर्नाटकने तामिळकाडूचा दुसऱ्या डावात 9 गड्यांनी गड्यांनी पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामना कर्नाटनाचा मुबई बरोबर शिवमोगा येथे होणार आहे. बेळगावच्या केएससीए मैदानावर […]