आनंद-बीएससी यांच्यात आज अंतिम लढत
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित करडी चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लबने लायाज अकादमीचा तर आनंद अकादमीने युनियन जिमखानाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. लक्ष्य खतायत व हैदरअली सय्यद यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात लायाज क्रिकेट अकादमीने प्रथम फंलंदाजी करताना 25 षटकात 9 गडी बाद 60 धावा केल्या. त्यात विनायक एन. ने 28, वेदांत बिजलने 21 तर श्रेयस नंदीने 14 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे लक्ष्य खतायतने 4 धावांत 2, सिद्धार्थ रायकरने 8 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 10.5 षटकात 1 गडी बाद 61 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात सचिन तलवारने 4 चौकारांसह 27, लक्ष्य खतायतने 3 चौकारांसह 21 धावा केल्या. लायाजतर्फे सिद्धार्थने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडी बाद 152 धावा केल्या. त्यात ओमकार चौगुले व अर्जुन यळ्ळुरकर यांनी 5 चौकारांसह प्रत्येकी 38 धावा केल्या. आनंदतर्फे अथर्व करडी व स्वराज्य जुवेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 20 षटकात बिनबाद 155 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात हैदरअली व स्कंद शेट्टी यांनी 1 षटकार व 7 चौकारांसह प्रत्येकी 70 धावा करून पहिल्या गड्यांसाठी 155 धावांची भागीदारी केली.
Home महत्वाची बातमी आनंद-बीएससी यांच्यात आज अंतिम लढत
आनंद-बीएससी यांच्यात आज अंतिम लढत
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित करडी चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लबने लायाज अकादमीचा तर आनंद अकादमीने युनियन जिमखानाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. लक्ष्य खतायत व हैदरअली सय्यद यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात लायाज क्रिकेट अकादमीने प्रथम फंलंदाजी […]