गाडेमार्ग येथील ड्रेनेजचा तो खड्डा बुजवा
बेळगाव : शहापूर-गाडेमार्ग वॉर्ड क्रमांक 27 मधील मुख्य रस्त्यावरच मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून त्या खड्यांची दुरुस्ती करावी. मुख्य म्हणजे या खड्याच्या खाली जुनी ड्रेनेज पाईप असून सतत पाणी वाहत आहे. तेंव्हा महानगरपालिकेने त्या पाईपची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. स्मार्टसिटी अंतर्गत विविध कामे करण्यात आली तरी बऱ्याच ठिकाणची कामेही अर्धवट राहिली आहेत. महत्त्वाचे म्हणजे ड्रेनेजची समस्या शहरामध्ये गंभीर स्वरुप धारण करत आहे. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. सतत रहदारी असलेल्या या ठिकाणी ड्रेनेजमुळेच रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. तेंव्हा तातडीने त्याची दुरुस्ती करून भगदाड बुजवावे, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली.
Home महत्वाची बातमी गाडेमार्ग येथील ड्रेनेजचा तो खड्डा बुजवा
गाडेमार्ग येथील ड्रेनेजचा तो खड्डा बुजवा
बेळगाव : शहापूर-गाडेमार्ग वॉर्ड क्रमांक 27 मधील मुख्य रस्त्यावरच मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून त्या खड्यांची दुरुस्ती करावी. मुख्य म्हणजे या खड्याच्या खाली जुनी ड्रेनेज पाईप असून सतत पाणी वाहत आहे. तेंव्हा महानगरपालिकेने त्या पाईपची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. स्मार्टसिटी अंतर्गत विविध कामे करण्यात आली तरी बऱ्याच ठिकाणची कामेही […]