पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊतांच्या विरोधात भाजप नेत्याकडून तक्रार दाखल

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आपल्या दिलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. छत्रपती संभाजी नगर येथे पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या बाबत बोलताना संजय राऊतांनी आक्षेपार्ह वक्तव्य दिले होते. नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान …

पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊतांच्या विरोधात भाजप नेत्याकडून तक्रार दाखल

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आपल्या दिलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. छत्रपती संभाजी नगर येथे पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या बाबत बोलताना संजय राऊतांनी आक्षेपार्ह वक्तव्य दिले होते. नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू असे विधान संजय राऊतांनी केले होते. या वादग्रस्त विधानावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या विरोधात छत्रपती संभाजी नगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.  

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असून देशाचे पंतप्रधान मोदींवर केलेले वक्तव्य चुकीचे आणि निंदनीय आहे. या विरोधात कुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतांचे असे वक्तव्य सामाजिक द्वेष निर्माण करणारे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे. 

 

Edited By- Priya Dixit 

 

Go to Source