Karad Crime : कराडात दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी ; एकजण जखमी

                            सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल  कराड : गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत शुक्रवारी रात्री मरामारी झाली. यात एकजण जखमी झाला असून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशोक चौक शिंदे गल्ली शनिवार पेठ कराड येथे रात्री साडेदहा वाजण्याच्या […]

Karad Crime : कराडात दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी ; एकजण जखमी

                            सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
 कराड : गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत शुक्रवारी रात्री मरामारी झाली. यात एकजण जखमी झाला असून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशोक चौक शिंदे गल्ली शनिवार पेठ कराड येथे रात्री साडेदहा वाजण्याच्या ही घटना घडली असून पोलीस शिपाई संदिप कोळी यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील हिंदूतेज गणेश मंडळ व नवहिंद गणेश मंडळातील कार्यकर्त्यांत गणपती विसर्जन मिरवणुकीत वाद झाला होता. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास याच जुन्या वादातून दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत मारामारी झाली. याबाबतची माहिती मिळताच फिर्यादी पोलीस शिपाई संदिप कोळी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यावेळीअशोक चौक शिंदे गल्ली येथील शिविगाळ, रस्त्यावर जमाव जमलेला होता. एकमेकांना आरडाओरडा करीत हाताने मारहाण करण्यात येत होती. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून भांडणे सोडवली तसेच जमाव पांगवला. यावेळी सौरभ संजय गोसावी यांच्या उजव्या डोळ्याच्या वरती दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रथम कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार केले.
तसेच पुढील उपचारासाठी त्यांना कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. संदिप कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिपक बजरंग विभुते, आदित्य बल्लाळ, समर्थ गोसावी, सुरज संपत नांदे, ऋषिकेश दिपक शिंदे व मंगेश अरूण महाडीक (सर्व रा. शिंदेगल्ली शनिवार पेठ कराड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.