फेस्टिव्ह स्वीट–कस्टर्ड ॲपल पुडिंग, १५ मिनिटांत तयार!

साहित्य- सीताफळ (कस्टर्ड ॲपल)-२ मोठे दूध- ५०० मिली कस्टर्ड पावडर (व्हॅनिला)- २ टेबलस्पून साखर-५-६ टेबलस्पून ब्रेड-४ स्लाइस कंडेन्स्ड मिल्क- २ टेबलस्पून व्हॅनिला एसेंस-२-३ थेंब चिरलेले काजू, बदाम, मनुके

फेस्टिव्ह स्वीट–कस्टर्ड ॲपल पुडिंग, १५ मिनिटांत तयार!

साहित्य-

सीताफळ (कस्टर्ड ॲपल)-२ मोठे 

दूध- ५०० मिली 

कस्टर्ड पावडर (व्हॅनिला)- २ टेबलस्पून

साखर-५-६ टेबलस्पून  

ब्रेड-४ स्लाइस 

कंडेन्स्ड मिल्क- २ टेबलस्पून

व्हॅनिला एसेंस-२-३ थेंब

चिरलेले काजू, बदाम, मनुके

ALSO READ: पोषकतत्वांनी भरपूर बीटाची खीर रेसिपी

कृती-

सर्वात आधी सीताफळ गर तयार करा. आता सीताफळ उघडा, बिया काढून फक्त मऊ गर घ्या. गर चांगला मॅश करा किंवा मिक्सरमध्ये २ सेकंद फिरवून घ्या. बाजूला ठेवा. आता १/४ कप थंड दुधात २ टेबलस्पून कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्या.  आता उरलेले दूध  गरम करा, त्यात साखर घाला. दूध उकळी आल्यावर कस्टर्ड मिश्रण हळूहळू घालून सतत ढवळत राहा. २-३ मिनिटांत घट्ट होईल. गॅस बंद करा, व्हॅनिला एसेंस घाला. आता ब्रेड स्लाइसचे कडा काढा. सर्व्हिंग बाऊल/ग्लासमध्ये ब्रेडचे तुकडे ठेवा (१ लेयर). गरम कस्टर्ड थोडे थंड झाल्यावर त्यात सीताफळ गर घाला. चांगले मिक्स करा. तसेच कंडेन्स्ड मिल्क घातल्यास गोडवा वाढेल. आता ब्रेड लेयरवर सीताफळ कस्टर्ड ओता. वरती ड्रायफ्रूट्स, पुन्हा ब्रेड, पुन्हा कस्टर्ड असे लेयर्स करा. शेवटची लेयर कस्टर्डची ठेवा. आता फ्रिजमध्ये २-३ तास थंड करा. तसेच  सर्व्ह करताना वर ड्रायफ्रूट्स किंवा सीताफळ गराने सजवा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता,  विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: गुलाब शेवया खीर रेसिपी

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: स्वादिष्ट अशी बिस्कीट खीर रेसिपी