पौष्टिक मेथीचे कटलेट रेसिपी

साहित्य- मेथी बारीक चिरलेली आले-लसूण पेस्ट बटाटे उकडलेले मसाले ब्रेडचे तुकडे कॉर्न फ्लोअर

पौष्टिक मेथीचे कटलेट रेसिपी

साहित्य-

मेथी बारीक चिरलेली 

आले-लसूण पेस्ट

बटाटे उकडलेले

मसाले  

ब्रेडचे तुकडे

कॉर्न फ्लोअर

 

कृती-

सर्वात आधी एका कढईत थोडे तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालावे. तसेच आता त्यामध्ये आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतवून घ्यावे. आता मेथी घालून परतवून झाकण ठेवावे व वाफ येऊ द्यावी. आता त्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालावे. तसेच चिरलेले काजू, जिरे, धणे, हळद, मीठ आणि गरम मसाला घालून मिक्स करावे व परतवून घ्यावे. मिश्रण पाण्याने ओले वाटत असेल तर अधिक ब्रेड क्रम्ब्स किंवा एक चमचा बेसन घालावे. गॅस बंद करून हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. एका प्लेटमध्ये ब्रेडक्रंब ठेवा आणि कॉर्न फ्लोअरचे द्रावण देखील तयार करून घ्यावे. तसेच थोडेसे मिश्रण हातात घेऊन त्याचा गोळा बनवावा. हा गोळा कॉर्न फ्लोअरच्या द्रावणात बुडवून घ्या आणि नंतर ब्रेडक्रंबमध्ये गुंडाळा आणि प्लेटमध्ये ठेवा. त्याच पद्धतीने सर्व गोळे तयार करा. व हलकेसे तव्यावर फ्राय करून घ्यावे. तर चला तयार आहे आपले मेथीचे कटलेट रेसिपी. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik