संकल्प पत्रासाठी लोकांकडून अभिप्राय मागविणार
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांची माहिती : बेंगळुरात अभियानाचे उद्घाटन
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजपच्या संकल्प पत्रासाठी राज्यातील किमान 3 लाख लोकांकडून अभिप्राय मागविण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील 1 कोटी लोकांची मते गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली. मल्लेश्वर येथील भाजप प्रदेश कार्यालय जगन्नाथ भवन येथे संकल्प पत्र संग्रह अभियानाचे उद्घाटन करून ते बोलत होते. सर्व विधानसभा मतदारसंघात सूचना पेटी ठेवण्यात येणार आहे. मिस्ड कॉल देऊन सहभागी होऊ शकतो. कॉल करण्यासाठी 909090-2124 क्रमांक देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या काउंटडाऊनच्या काळात नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या विचारसरणीनुसार जाहीरनाम्याऐवजी जन अभिप्रायाच्या माध्यमातून संकल्प पत्राद्वारे निवडणूक लढवली जात आहे. भाजपच्या केंद्र सरकारने 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत दिलेली जवळपास सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. मोदीजींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात केवळ आश्वासनांची पूर्तता करत पायाभरणीसह योज्ना वेळेत पूर्ण झाल्याचे बी. वाय विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.
जनसंघाच्या काळापासून जाहीरनाम्यात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या हौतात्म्याला कारणीभूत असलेले जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करून मोदींनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केले आहेत. अयोध्येत बलरामाचे भव्य राममंदिर बांधण्यात आले आहे. यावेळी जाहीरनामाऐवजी संकल्प पत्र मांडण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शतक महोत्सवावेळी म्हणजेच 2047 मध्ये आपला भारत विकसित भारत असेल असा संकल्प मोदीजींनी आहे. ते साकार करण्यासाठी जनमत चाचणी अभियान सुरू करण्यात आले आहे. शेतकरी, महिला आणि तऊणांसह समाजातील सर्व घटकांकडून अभिप्राय गोळा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात 3 ते 15 मार्च दरम्यान सदर अभियान होणार आहे. ‘विकसित भारत-हीच मोदी गॅरंटी’ या विषयावर राज्यभर व्हिडिओ व्हॅन आणि सूचना पेटीच्या माध्यमातून पुढील 5 वर्षांच्या लक्ष्यावर राज्यातील जनतेचा आशीर्वाद घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.
Home महत्वाची बातमी संकल्प पत्रासाठी लोकांकडून अभिप्राय मागविणार
संकल्प पत्रासाठी लोकांकडून अभिप्राय मागविणार
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांची माहिती : बेंगळुरात अभियानाचे उद्घाटन प्रतिनिधी/ बेंगळूर भाजपच्या संकल्प पत्रासाठी राज्यातील किमान 3 लाख लोकांकडून अभिप्राय मागविण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील 1 कोटी लोकांची मते गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली. मल्लेश्वर येथील भाजप प्रदेश कार्यालय जगन्नाथ भवन येथे संकल्प पत्र […]