फजल शेख चालत हजला जाणार

बेळगाव : गदगच्या शिरटी तालुका येथून हज यात्रेसाठी पायी चाललेल्या फजल शेख या युवकाचा सोमवारी अमननगर येथे असलेल्या अली मशिदीच्या समितीतर्फे सत्कार करण्यात आला. फजलने हुबळी येथून आपल्या पायी प्रवासाला सुरुवात केली. सोमवार दि. 27 रोजी तो बेळगावमध्ये दाखल झाला. यावेळी सदर मशिदीच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. बेळगावहून तो कोल्हापूरला रवाना झाला. तेथून पुणे, मुंबई, […]

फजल शेख चालत हजला जाणार

बेळगाव : गदगच्या शिरटी तालुका येथून हज यात्रेसाठी पायी चाललेल्या फजल शेख या युवकाचा सोमवारी अमननगर येथे असलेल्या अली मशिदीच्या समितीतर्फे सत्कार करण्यात आला. फजलने हुबळी येथून आपल्या पायी प्रवासाला सुरुवात केली. सोमवार दि. 27 रोजी तो बेळगावमध्ये दाखल झाला. यावेळी सदर मशिदीच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. बेळगावहून तो कोल्हापूरला रवाना झाला. तेथून पुणे, मुंबई, दिल्ली ते वाघा बॉर्डर ते पाकिस्तान, इराण, इराक असा प्रवास करत सौदी अरेबियामध्ये असलेल्या मक्का मदिनेला पायी जाणार आहे. 5 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर तो कापणार असून या दरम्यान आपण सर्वजण एक आहोत आणि सर्वजण मिळून देशाचे नाव उज्ज्वल करूया, असा संदेश तो देत आहे.