उल जलूल इश्क’मध्ये फातिमा
चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण
अभिनेता विजय वर्मा अलिकडेच ‘मर्डर मुबारक’ चित्रपटात दिसून आला होता. यातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. विजय आता आणखी एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ‘उल जलूल इश्क’ असे या चित्रपटाचे नाव आहे. अभिनेता विजय आणि फातिमा यांनी स्वत:च्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे.
या चित्रपटाचा निर्माता मनीष मल्होत्राने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत छायाचित्रेही सादर केली आहेत. तसेच त्याने चित्रपटातील कलाकारांसोबत पूर्ण टीमचे आभार मानले आहेत. प्रत्येक तंत्रज्ञ, कलाकार आणि क्रू सदस्याचे आभार मानतो असे त्याने म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी मनीषने चित्रपटाच्या सेटवरील काही छायाचित्रे शेअर केली होती.
विभु पुरी यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शारिब हाशमी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर या चित्रपटात विजय वर्मा आणि फातिमा यांची नवी जोडी दिसून येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
Home महत्वाची बातमी उल जलूल इश्क’मध्ये फातिमा
उल जलूल इश्क’मध्ये फातिमा
चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण अभिनेता विजय वर्मा अलिकडेच ‘मर्डर मुबारक’ चित्रपटात दिसून आला होता. यातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. विजय आता आणखी एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ‘उल जलूल इश्क’ असे या चित्रपटाचे नाव आहे. अभिनेता विजय आणि फातिमा यांनी स्वत:च्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटाचा निर्माता […]
