लातूर जिल्ह्यात पिता- मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात मल्हिप्परगा गावात तलावाच्या पाण्यात गुऱ्यांना अंघोळीला घेऊन गेलेल्या शेतकरी वडील आणि मुलाचा बुडून मृत्यू झाला.
सदर घटना 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. शेतकरी तिरुपती बाबुराव पवार हे आपल्या 12 वर्षाच्या मुला नामदेवसह शेताच्या जवळ असलेला तलावात गुरांना अंघोळीसाठी घेऊन गेले असता एक बैल खोल पाण्यात जाऊ लागला त्याला वाचवण्यासाठी 12 वर्षाचा नामदेव हा किनाऱ्यावर आणण्यासाठी गेला आणि पाण्याची खोली न कळल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला.
त्याला बुडताना पाहून तिरुपती देखील पाण्यात गेले आणि पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. या घट्नेनन्तर गावात शोककळा पसरली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited By – Priya Dixit