हलग्याजवळ अपघातात बीडचे पिता-पुत्र जखमी
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलग्याजवळ अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या पिता-पुत्राला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात घडला असून बीड जिल्ह्यातील चालक व त्याच्या मुलाला वाचविण्यात आले आहे. सुभाष नागूराव दळवी (वय 37), त्याचा मुलगा गणेश (वय 9) रा. कोरावाडी, जि. बीड अशी त्यांची नावे आहेत. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास सुभाष चालवत असलेल्या ट्रकची अन्य वाहनाला धडक बसली. या अपघातानंतर सुभाष व मुलगा गणेश हे दोघे केबिनमध्ये अडकले. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. जिल्हा अग्निशमन अधिकारी शशीधर निलगार, साहाय्यक अधिकारी अरुण माळोदे, नागाप्पा बु•ण्णावर, नजीरसाब पैलवान, भरत हलकर्णी, राजकुमार बोगार, सदानंद राचण्णावर आदी घटनास्थळी दाखल झाले. वेगवेगळ्या अवजारांचा वापर करून ट्रकच्या केबिनमध्ये स्टेअरिंगमध्ये अडकलेला चालक व त्याच्या मुलाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. यासंबंधी शुक्रवारी रात्री हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी हलग्याजवळ अपघातात बीडचे पिता-पुत्र जखमी
हलग्याजवळ अपघातात बीडचे पिता-पुत्र जखमी
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलग्याजवळ अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या पिता-पुत्राला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात घडला असून बीड जिल्ह्यातील चालक व त्याच्या मुलाला वाचविण्यात आले आहे. सुभाष नागूराव दळवी (वय 37), त्याचा मुलगा गणेश (वय 9) रा. कोरावाडी, जि. बीड अशी त्यांची नावे आहेत. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल […]
