माळी येथे भीषण अपघात 31 जणांचा मृत्यू
आफ्रिकन देश माली येथे मंगळवारी झालेल्या बस अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला. नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिबा येथे घडली.
सायंकाळी 5 वाजता हा अपघात झाला. बस बुर्किना फासोला जात होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
माळीचे खराब रस्ते हे वाढत्या रस्ते अपघातांचे कारण सांगितले जात आहे. जगभरातील रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू आफ्रिकेत होतात.
काल झालेल्या अपघातात ३१ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. बस बुर्किना फासोला जात असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत पडली.
Edited by – Priya Dixit