पुलाचा स्लॅब कोसळून भीषण अपघात

बिहारमधील सुपौलमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. कोसी नदीवर येथे निर्माणाधीन पूल कोसळून अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला तर अनेक मजूर ढिगाराच्या खाली गाडले गेले

पुलाचा स्लॅब कोसळून भीषण अपघात

बिहारमधील सुपौलमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. कोसी नदीवर येथे निर्माणाधीन पूल कोसळून अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला तर अनेक मजूर ढिगाराच्या खाली गाडले गेले. त्यांच्या संख्येबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सुपौल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. यावेळी एका बांधकामाधीन पुलाचा काही भाग कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुपौल जिल्ह्यातील बकौर आणि मधुबनी जिल्ह्यातील भेजा दरम्यान कोसी नदीवर निर्माणाधीन पुलाचा काही भाग मारिचाजवळ कोसळला.

 

घटनेची माहिती मिळतातच जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी मदत व बचाव कार्य सुरु आहे. 

 

 Edited by – Priya Dixit 

 

 

 

Go to Source